राष्ट्रपिता म.फुले अन् सत्यशोधक समाज संघाची विचारसरणी साजरी
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी आपल्या सहकाऱ्यांसोबत सत्यशोधक समाज संघाची स्थापना केली. अशा ऐतिहासिक घटनेच्या औचित्य साधून संघाचा १५२ वा वर्धापन दिन जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा ऐतिहासिक शाक्त पंथीय राज्याभिषेक आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाशी जोडला गेला. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीस अभिवादन करून फोटोला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव रमेश वराडे यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांना सत्यशोधक समाज संघाची स्थापना का करावी लागली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला असताना दुसरा शाक्त पद्धतीने राज्याभिषेक का केला? याबाबत सविस्तर विवेचन केले. तसेच आजच्या काळातील भारतीय संविधानाचे महत्त्व त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
यांची लाभली उपस्थिती
कार्यक्रमाला जामनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पवन माळी तसेच टाकळी खुर्द गावातील माजी सरपंच समाधान वराडे, सारंगधर अहिरे, मंगलदास अहिरे, ग्रामपंचायत सदस्य शालिग्राम अहिरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष माळी, बापू महाले, शांताराम अहिरे, मधुकर चवरे, आनंद अहिरे, सीताराम नेरकर, लखन बोरसे, सीताराम चवरे, सुरेश तायडे, भागवत पाटील, गजानन अहिरे, राजीव जगताप, कैलास चवरे, ईश्वर तायडे, सुकलाल महाजन, लक्ष्मण नेरकर, संजय दुधे, अर्जुन चौरे, अशोक माळी, भगवान वराडे, मुरलीधर चवरे, अशोक माळी, सीताराम धोटे यांच्यासह बहुजन समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते कैलास महाजन यांनी संघाची विचारसरणी, उद्दिष्टे व कार्यप्रणाली उपस्थितांना समजावून सांगितली. आभार बाळू चवरे यांनी मानले.