आसोदा विद्यालयातील व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
आपल्या जीवनात सर्वात जास्त लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे शालेय जीवन. शालेय जीवनातील शिस्त आणि ज्ञानार्जन करण्याची क्षमता हीच ‘जीवनाची’ खरी वाट असते, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन होते.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय वर्गशिक्षक एस. के. राणे-राजपूत यांनी करून दिला. प्रास्ताविक विद्यार्थिनी सिद्धीका पाटील हिने सादर केले. भूपाळी देवयानी माळी तिच्या मैत्रिणींनी, ईशस्तवन तनुश्री सोनवणे तिच्या मैत्रिणींनी तसेच स्वागतगीत तेजस्विनी पाटील, सहकाऱ्यांनी सादर केले. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे, शुभांगिनी महाजन उपस्थित होत्या.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन सानिया चौधरी तर आभार पौर्णिमा फेगडे हिने मानले.