Antarbharati Balakumar : दुसरे अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन २२ नोव्हेंबरपासून

0
16

संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ. शैलजा करोडे ; विद्यार्थ्यांसह तरुणांमध्ये साहित्याची आवड वाढविण्याचा उद्देश

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

विद्यार्थ्यांसह तरुणांमध्ये बालपणापासून साहित्याची आवड निर्माण करणे तसेच साहित्य चळवळ वृद्धिंगत करणे, ह्या उद्देशाने समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे ‘दुसरे अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन’ तीन दिवसीय संमेलन येत्या २२, २३ व २४ नोव्हेंबर, २०२५ रोजी पार पडणार आहे. साहित्य संमेलनाचे पहिले आयोजन यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या आभासी संमेलनासाठी विद्यार्थ्यांसह साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या उत्सुकतेत वाढ झाली आहे.

समाज चिंतामणी प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षांपासून सामाजिक कार्याबरोबरच वाचन संस्कृती वाढीसाठी विविध नवोपक्रम राबवत आहे. साहित्य संमेलनात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नामवंत साहित्यिकांचा सहभाग राहणार आहे. इच्छुकांना १५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष  ज्येष्ठ कवयित्री डॉ. शैलजा करोडे, मुंबई, उद्घाटक  कवियत्री निशा डांगे/नायगावकर, पुसद, जि. यवतमाळ, स्वागताध्यक्ष कवी इरफान शेख, चंद्रपूर, समारोपाध्यक्ष कवी रवींद्र जवादे, मूर्तिजापूर, जि. अकोला असतील.

संमेलनातील प्रमुख कार्यक्रम असे :

संमेलनातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये २२ नोव्हेंबर रोजी उद्घाटन समारंभ सायंकाळी ६:३०, अभिवाचन ७:३० ते ८:३०, बालकुमार कविसंमेलन ८:३०ते ९:३०, २३ नोव्हेंबरला मी लिहिलेले पुस्तक ६:३० ते ७:३०, मुलाखत ७:३० ते ८:३०, बहुभाषिक कविसंमेलन ८:३० ते ९:३०, २४ नोव्हेंबरला कथाकथन ६:३० ते ७:३०, निमंत्रितांचे कवि संमेलन ७:३० ते ८:३०, समारोप भाषण ८:३० ते ९:३० आदींचा समावेश आहे. सहभागासाठी आर.डी.कोळी ९११२९१५१०८ /९८६०७०५१०८, चक्रनारायण किशोर ९३२५५५८३०५, ज्योती लाभशेटवार ९९२१९३३५०१, उज्ज्वला इंगळे ९५५२२७५८२१, गोविंद पाटील  ८७८८३३४८८२, डॉ. अशोक पारधे ९८२२२८७४५५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here