नेरीला ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ अभियानाचा उत्साहात प्रारंभ
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
महिला आरोग्य हेच कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचे मूळ आहे. निरोगी माता म्हणजे निरोगी पिढी. केंद्र व राज्य सरकार महिलांच्या आरोग्य व सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे. ‘स्वस्थ नारी–सशक्त परिवार’ अभियान त्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे. त्यामुळे महिला आरोग्य बळकट असेल तरच परिवार सशक्त असेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीष महाजन यांनी केले. महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणासाठी सुरू झालेल्या “स्वस्थ नारी–सशक्त परिवार” विशेष मोहिमेचा प्रारंभ जामनेर तालुक्यातील नेरी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते मनोगतात बोलत होते. ही मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राबविण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सेवानिवृत्त अभियंता तथा सामाजिक कार्यकर्ते जे. के. चव्हाण, समाजसेवक कमलाकर पाटील, शेखर काळे, अमर पाटील, भगवान इंगळे, सुभाष वाघोडे, प्रकाश पाटील, शरद पाटील, अण्णा पिठोडे, पितांबर भावसार, मुरली अण्णा आदी मान्यवर उपस्थित होते.
अभियानांतर्गत महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, स्तन-गर्भाशय कर्करोग, गरोदर-स्तनदा माता तपासणी, सिकल सेल, ॲनिमिया तपासणी, मासिक पाळी-स्वच्छता मार्गदर्शन, पोषण आहारावरील जनजागृती तसेच आरोग्य विषयक चर्चा अशा विविध तपासण्या-उपक्रम राबविण्यात आले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आवश्यक उपकरणे, स्टाफसह उपस्थित होती.
आयुष्मान गोल्डन कार्डचे ९३० लाभार्थींना वाटप
शिबिरात १६४ महिलांची नेत्र तपासणी, ३७ गरोदर मातांची तपासणी, १४ महिलांची मेडिसीन तपासणी, ४० महिलांची दंत तपासणी, ८ महिलांची अस्थिरोग तपासणी तर १२३ विद्यार्थिनींची रक्त तपासणी करण्यात आली. याशिवाय ९३० लाभार्थींना आयुष्मान गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमात टीबी मुक्त भारत, राष्ट्रीय कीटक रोग नियंत्रण कार्यक्रम, सिकल सेल, कुपोषण व पोषण आहार यासंदर्भातील जनजागृती स्टॉल लावण्यात आले होते.
अभियानात यांनी नोंदविला सहभाग
अभियानात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल देसले, डॉ. कांचन गायकवाड, डॉ. गिरीश पाटील, डॉ. सुवर्णा पांढरे, डॉ. नामदेव पाटील, डॉ. फिरोज खान, आरोग्य निरीक्षक सोपान राठोड, पंकज इंगळे, रवींद्र सूर्यवंशी, संदीप सावकारी, गणेश पाटील, श्रीकृष्ण बाबर, गणेश शिंदे, पंकज गणवीर, दिलीप शिंदे, अंबिका बोरुडे, जयश्री कुलकर्णी, स्नेहा कोळी, जितेंद्र नाईक, सुरेंद्र चौधरी, तसेच गटप्रवर्तक, आशा, अंगणवाडी सेविका यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महिलांसाठी मोहीम ठरतेय मोलाची
याप्रसंगी महिलांच्या आरोग्यविषयक सर्वांगीण जनजागृती घडवून आणण्यासाठी ही मोहीम मोलाची ठरली असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतात सांगितले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सूत्रसंचालन आशिष दामोदर तर आभार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी मानले.