One Young Man Drowned : विसर्जनावेळी एक तरुण बुडाला, दुसरा बचावला

0
9

शहरातील गिरणा पंपिंग परिसरातील घटना

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

शहरातील वाघ नगरातील ३४ वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जनावेळी गिरणा नदीत बुडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. हा तरुण मित्रासोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून वाहून गेला. अद्याप त्याचा मृतदेह सापडला नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेत आहेत. मयत तरुणाचे नाव राहुल रतिलाल सोनार (वय ३४, रा. वाघ नगर, जळगाव) असे आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने तरुणाचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे राहुलच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शहरातील वाघ नगरात राहुल हा आई-वडील आणि मोठ्या भावासह वास्तव्यास होता. त्यातच कोल्हे हिल्स येथील एका हॉटेलमध्ये राहुल हा नोकरी करत होता. शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तो त्याचा मित्र विश्वनाथ पाटील सोबत आर्यन पार्क येथील गिरणा नदीच्या पात्रात गणपती विसर्जनासाठी गेला होता. दोघेही गणपती बुडविण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. त्यावेळी एकाने विश्वनाथला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, राहुल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here