भुसावळ प्रतिनिधी : दिपनगर निंभोरा (ता.भुसावळ) येथे वैकुंठवासी निवृत्ती छन्नु चौधरी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा निंभोरा बु. (ता.भुसावळ) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज मंगळवार दि.९ ते १६ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या कालावधीत दैनंदिन श्रीमद् भागवत कथा सकाळी नऊ ते ११ दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे प्रवक्ते हभप गजानन महाराज धानोरा वाल्मीक आश्रम (चिंचखेडा, जामनेर) हे लाभले असून दररोज काकड आरती सकाळी ५ ते ६.३०, विष्णुसहस्त्रनाम सकाळी ६.३० ते ७.३०, हरिपाठ सायंकाळी ५.३० वाजता व किर्तन दररोज रात्री ९ ते १० या कालखंडात होणार असूनन काल्याचे कीर्तन मंगळवार दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. कालखंडात अनुक्रमे हभप मनोज महाराज ओझरखेडा, पंकज महाराज शिरसोली, कैलास महाराज कुरंगी, लक्ष्मण शास्त्री महाराज खेडी-भोकरी, प्रल्हाद शास्त्री महाराज भागवताचार्य सिन्नर, संदीप महाराज विटनेर जळके, ज्ञानेश्वर महाराज जळगाव यांचे कीर्तन होणार असून दि.१५ रोजी रोजी सायंकाळी ४ ते ६ दरम्यान दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर १६ सप्टेंबर रोजी हभप अनिल महाराज भागवताचार्य कोसगाव यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच १६ रोजी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन श्रीमती जिजाबाई निवृत्ती चौधरी, वैभव चौधरी, निकिता निवृत्ती चौधरी, गोपीचंद चौधरी, चारुशिला गोपीचंद चौधरी, नैतिक चौधरी, रमाकांत चौधरी, ज्योती रमाकांत चौधरी व चौधरी परिवार पिंपरी सेकम-निंभोरा यांनी केले आहे.