बोदवड प्रतिनिधी : येथील जिल्हा परिषद जि.प.कन्या नंबर दोन मधील उपशिक्षिका संगिता देविदास शेळके यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व आ.राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला
यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संगीता देविदास शेळके यांनी किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यांचे निराकार करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापन करून त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केली. संगिता शेळके यांनी विविध स्वरचित कवितांचा संग्रह केला. मनूर बुद्रुक येथील संगीता शेळके या बोदवड येथील बरडिया शाळेतील उपशिक्षक संजय देवकर यांच्या पत्नी असून वरणगाव येथील उपशिक्षक संतोष शेळके यांच्या भगिनी आहेत.
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचे बोदवड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिता परमार, विस्तार अधिकारी हरी नानकर, केंद्रप्रमुख अनिल जाधव, त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच मित्रपरिवार यांनी अभिनंदन व कौतुक केले.