विद्यार्थ्यांकडून शाळेत ज्ञार्नाजनाचा अनुभव घेत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ‘शिक्षकांची’ भूमिका बजावली.
विद्यार्थ्यांनी शाळेत शिकविण्याचा अनुभव घेऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच दिवसभर कामकाज सांभाळले. माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या अध्यापन अनुभवाबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांनी त्यांच्या विकासासाठी केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल प्रेम, आदर, पावती आणि मान्यता दर्शविणारे विचार मांडले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.