Collection Of Waste Materials : पर्यावरण संरक्षणासाठी नारीशक्तीतर्फे निर्माल्य संकलन

0
20

गणरायाच्या विसर्जनासाठी पदाधिकाऱ्यांकडून श्रमदान करून सहकार्य

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील मेहरुण तलावावरील गणेशघाट येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने गणपती विसर्जनानिमित्त शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला. निर्माल्य संकलन करून गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

निर्माल्य पाण्यात विसर्जन करून कोणत्याही प्रकारची जलहानी होऊ नये. तसेच परिसरात प्रदूषण होणाऱ्या रोखण्याच्यादृष्टीने सर्व निर्माल्य एकाच ठिकाणी संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था ग्रुपच्या महिलांनी सकाळी साडे आठ वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत निर्माल्य संकलन केले. नारीशक्तीने श्रमदान करून गणेश विसर्जनासाठी सहकार्य केले.

याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष मनिषा पाटील, नूतन तासखेडकर, हर्षा गुजराती, रेणुका हिंगु, किमया पाटील, शोभना मकवाना, संगीता चौधरी, नीता वानखेडकर, नेहा जगताप, तेजल वनरा, जान्हवी जगताप उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here