महत्त्वाच्या समस्यांवर भर देऊन मार्गी लावण्याचे संबंधितांना आदेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
दरवर्षाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, प्रशासनाच्या मिरवणूक संबंधित सर्व विभागीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, २९ रोजी दुपारी १२ वाजता विसर्जन मिरवणूक मार्गाची तपासणी करण्यात आली. त्यात रस्त्यावरील सर्व खड्डे, खाली लोंबकत असलेल्या केबल वायरी, रस्त्यावरील पाण्याचे साठलेले डबके, घाणेकर चौकापासून पुढे दोन्ही बाजूंनी विद्युत रोषणाईसाठी अतिरिक्त लाइट्स बसविणे तसेच महर्षी दधीची चौकातील खड्डे व महत्त्वाच्या समस्यांवर भर टाकून त्या मार्गी लावावे, असे लक्षात आणून दिले.
मार्ग तपासणीवेळी जिल्हा महसूल विभागातून प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या सोबत नव्याने पदभार स्वीकारणारे नितीन गणापुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गिरीश सूर्यवंशी, मनपाचे उपायुक्त गोसावी, प्रकाश पाटील यांच्यासह महावितरणचे अधिकारी सोबत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे अध्यक्ष सचिन नारळे, ज्येष्ठ पदाधिकारी किशोर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक सुरज दायमा, राहुल परकाळे, धनंजय चौधरी, चेतन संकत, राहुल सनकत, भूषण शिंपी, गोपाल रामावत, विनोद अनपट, सुजय चौधरी, नितीन कोल्हे आदी उपस्थित होते.
