स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. यावेळी परिसरातील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी वैष्णवी नालकोल, सोनल राठोड यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले. ते सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत श्रवण केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे गणपती अथर्वशीर्षाचे महत्त्वाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही सदैव गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. त्याचे महत्त्व जाणून त्याच्या लाभाची प्राप्ती होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच गणपती अथर्वशीर्षालाही महत्त्व द्यावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.