Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात दाखल
    मुंबई

    खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात दाखल

    saimat teamBy saimat teamOctober 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने मंदाकिनी खडसे यांच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज मंदाकिनी खडसे या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. अटक होणार? भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

    मात्र, 12 ऑक्टोबर रोजी सेशन कोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

    ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला आहे.

    पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.

    भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जागेचा हा वाद ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली तीन कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप ईडीकडून एकनाथ खडसेंची चौकशी एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक 8 जुलै 2021 रोजी एकनाथ खडसेंची ईडीकडून 9 तास चौकशी करण्यात आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.