एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद, ओळख पटविण्याचे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणच्या तलावात मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी एका अज्ञात व्यक्तीचा पाण्यात बुडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून मयताच्या नातेवाईकांचा शोध सुरु असून ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील मेहरूण तलावातील पाण्यात बुडून एका अनोळखी अंदाजे ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याचा मृतदेह मयत स्थितीत रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल केला होता. मयत व्यक्तीचे वर्णन वय अंदाजे ४५ वर्षे, अंगात पांढरे बनियान, तपकीर रंगाचे अंर्तवस्त्र, रंग सावळा, उंची ५ फुट ५ इंच, बांधा सडपातळ अशी असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. अनोळखी मयताच्या नातेवाईकांसह ओळखणाऱ्यांना ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. तपास एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करीत आहे.