Bridge In Khanderav Nagar : खंडेराव नगरातील पुलाखाली ४८ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह

0
7

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील खंडेराव नगरातील रेल्वेपुलाखालील नाल्यात एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मयताचे मनोज माणिकराव देशमुख (रा.आशाबाबा नगर, जळगाव) असे नाव आहे. मयताच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

परिसरातील नागरिकांनी आपदा मित्र जगदीश बैरागी यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यांनीही लागलीच ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मयताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तसेच बैरागी यांनी रुग्णवाहिकेसाठी पप्पू जगताप यांच्याशी संपर्क साधून तेही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. घटनास्थळी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्यावर मयताच्या खिशात चिठ्ठी आढळून आल्याचे सांगण्यात आले.

मयत मनोज हे दोन भाऊ, बहिणींसह राहत होते. काही दिवसांपासून ते आजारी असल्यामुळे घरीच राहत होते. मंगळवारी, २६ रोजी सकाळी ७ वाजेनंतर ते खंडेराव नगर बोगद्याकडील भागात गेले होते. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, पुलावरून चालत असताना खाली पडून मनोज देशमुख यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here