जळगाव शनिपेठ पोलीस स्टेशनची कामगिरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली मोटार सायकल चोरीच्या प्रकरणाच्या तपासासह हद्दपारीतील गुन्हेगाराविरुद्ध कारवाई केली आहे. मोटार सायकल चोरीच्या तपासात चोरट्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या ताब्यातून चोरीची मोटार सायकल जप्त केली आहे. दुसऱ्या कारवाईत हद्दपारीच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या गुन्हेगारास हद्दीतून पकडून त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे.
शनीपेठ पोलीस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने भुसावळच्या इराणी मोहल्ल्यातून ताब्यात घेतले आहे. शनीपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकातील पो.हे.कॉ. प्रदीप नन्नवरे, पो.हे.कॉ. शशिकांत पाटील, अंमलदार निलेश घुगे, रवींद्र तायडे, पराग दुसाने, अमोल वंजारी, गणेश ढाकणे यांच्यासह भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील पो.हे.कॉ. रवी नेरकर, अंमलदार प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
कारवाईच्या पथकात यांचा होता सहभाग
दुसऱ्या कारवाईत हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार सागर ऊर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे यास त्याच्या शनीपेठ हद्दीतील घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध कारवाईत अंमलदार अमोल वंजारी, पराग दुसाणे, निलेश घुगे, काजोल सोनवणे आदींच्या पथकाने सहभाग घेतला. याव्यतिरिक्त भुसावळ येथून चोरीस गेलेले दुचाकी वाहन शनिपेठ पोलीस स्टेशनचे हद्दीत बेवारस अवस्थेत मिळून आले. संबंधित वाहन मालकाचा परिवहन विभाग आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मदतीने शोध घेऊन ते वाहन मूळ मालकास परत देण्यात आले. तपासकामी पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील पो.हे.कॉ. रवी नेरकर, प्रशांत देशमुख यांनी सहभाग घेतला.