Godavari Polytechnic : गोदावरी पॉलिटेक्निकच्या एआय-एमएल विभागाचा जेएनपीए पोर्ट मुंबई अभ्यासदौरा

0
13

भविष्यातील करिअरसाठी दौरा प्रेरणादायी ठरणार : आयोजकांनी व्यक्त केला विश्वास

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

गोदावरी पॉलिटेक्निकच्या एआय-एमएल विभागाच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच जेएनपीए पोर्ट, मुंबई येथे अभ्यास दौरा केला. अशा भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे पाहता आले की, आधुनिक लॉजिस्टिक्स आणि पोर्ट व्यवस्थापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो यावर अभ्यास केला.

दौऱ्यात विद्यार्थ्यांनी पोर्ट ऑपरेशन्स आणि ऑटोमेशन भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्टपैकी एक असलेल्या जेएनपीएमध्ये कंटेनर हाताळणी, मालवाहतूक प्रक्रिया आणि साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रगत क्रेन आणि स्वयंचलित प्रणालींचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. जेएनपीएने सौरऊर्जेचा वापर आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांना हरित लॉजिस्टिक्स विषयी शिकायला मिळाले. विद्यार्थ्यांनी जेएनपीएच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक शिस्त यांच्यातील संबंध समजून घेतला. तसेच जागतिक व्यापारात नवीन तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरते, हे अनुभवले. दौऱ्याचे मार्गदर्शन प्रा. प्रसाद मराठे, श्रद्धा मुंदडा, नेहा चौधरी आणि नीलिमा चौधरी यांनी केले.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले की, अशा दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान आणि त्याचा औद्योगिक उपयोग यांच्यातील दुवा समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन अधिक विकसित होतो. हा दौरा विद्यार्थ्यांसाठी केवळ तांत्रिक ज्ञान मिळविण्यापुरता मर्यादित नाही. त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here