Money Lending In Jalgaon : जळगावात अवैध सावकारीवर कारवाई, दस्तावेज जप्त

0
61

कारवाईत सौदा पावती ३, खरेदी खत ९ जप्त

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरात विना अनुज्ञप्ती अवैध सावकारी करत असल्याच्या तक्रारीनुसार सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गैरअर्जदार मनोज वाणी, कल्पना वाणी (रा.श्रीकृष्ण कॉलनी, गणेश कॉलनी जवळ, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये धाड कारवाईद्वारे शोध कार्य करण्यात आले. कारवाईत सौदा पावती-३, खरेदीखत-९ असे दस्तावेज जप्त केले आहे.

ही कारवाई सहकार विभागांतर्गत पोलीस बंदोबस्तासह पंचांच्या समक्ष करण्यात आली. कलम १६ व १७ अंतर्गत चौकशी करुन पुढील चौकशी उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका यांच्या स्तरावर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. कारवाईसाठी गौतम बलसाणे यांचे मार्गदर्शन लाभले. उपनिबंधक धर्मराज पाटील यांनी अंमलबजावणी केली. कारवाईच्या पथकात पथक प्रमुख भडगावचे सहाय्यक निबंधक महेश कासार, सहकारी अधिकारी आर.आर.पाटील, जळगावचे वरिष्ठ लिपिक विक्रांत म्हस्के, प्रिया कराळे, रावेरचे सहकार अधिकारी फकिरा तडवी यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here