‘Anubhuti Residential School’ : शालेय तालुका बॅडमिंटन स्पर्धेत ‘अनुभूती निवासी स्कूल’चे वर्चस्व

0
31

तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक पटकावले

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील अनुभूती निवासी स्कूलमध्ये जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा-२०२५ सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले. अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडानुभूतीमधील बॅडमिंटन हॉल येथे स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी जळगाव तालुका क्रीडा प्रमुख प्रशांत कोल्हे, अन्य शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेत जळगाव तालुक्यातील २८ संघांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, जैन स्पोर्टस अकॅडमीद्वारे आयोजित केले होती.

स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त झालेल्या संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड व अनुभूती स्कूलद्वारे प्रायोजित सुवर्ण, रजत व कांस्यपदक देण्यात आले. अंतिम सामन्यांपर्यंत चुरसीच्या झालेल्या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलला १४ वर्षाखालील मुलांच्या संघात, १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या संघाने प्रथम स्थान प्राप्त करत सुवर्ण पदक मिळविले तर १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय स्थान मिळविले. त्यामुळे त्यांना रजत पदकाने गौरविण्यात आले. मुलींच्या १७ वर्षाखालील संघाने तृतीय क्रमांक मिळवित कास्य पदक प्राप्त केले. सर्व विजयी खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, मंजूषा भिडे, कुलदीप पांडे, मनिषा देशमुख, श्री. राहुल, किशोर सिंह, दीपीका ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यशस्वी खेळाडूंचे कौतुक

अनुभूती स्कूलच्या यशस्वी खेळाडूंचे अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी यांच्यासह सहकाऱ्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंह व दीपिका ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. पंच म्हणून जाजिब शेख, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, पूनम ठाकूर, श्री. सोमाणी यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी समीर शेख, विकास बारी, शुभम पाटील यांच्यासह अनुभूती स्कूल, जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here