Spectrum Company In Jalgaon : जळगावातील स्पेक्ट्रम कंपनीतील चोरीचा पर्दाफाश ; तिघे अटकेत

0
28

वाघ नगरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

शहरातील एमआयडीसी परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजमधून झालेल्या कॉपरच्या पट्ट्यांच्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई वाघ नगर येथे करण्यात आली.

स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजमधून शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अंदाजे ४० हजार रुपये किमतीच्या कॉपरच्या पट्ट्या चोरीला गेल्या होत्या. कंपनीचे मॅनेजर बाळू गोवर्धन पाटील यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, ही चोरी कंपनीतच काम करणाऱ्या व्यक्तींनी केली आहे. अशा माहितीच्या आधारे ओम रामेश्वर पोपटकर (वय २०, रा. वाघ नगर), रोहित उर्फ रोहन भिकन मराठे (वय २२, रा. कासमवाडी) आणि सागर धर्मेंद्र सपकाळे (वय १९, रा. वाघ नगर) तिघांना वाघ नगर येथून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान, तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील गुन्ह्याचा तपास करत आहे. पोलिसांनी आरोपींकडून अशाच प्रकारच्या इतरही चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे.

यांनी केली कारवाई

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर आणि सिद्धेश्वर डापकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here