चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे अभिनव उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
मोबाईलच्या वाढत्या अतिवापरामुळे शालेय विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी आता मोबाईल दिसू लागले आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. असे सर्वत्र चित्र लक्षात घेऊन राष्ट्रीय मार्गावरील गिरणा नदीकाठालगतच्या जलाराम बाप्पा मंदिराशेजारील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या अभिनव उपक्रमात येत्या रविवारी, २४ ऑगस्ट रोजी सर्वांसाठी अशी मोफत ‘मोबाईल मुक्तीची कार्यशाळा’ जलाराम मंदिराच्या हॉलमध्ये सकाळी १० ते २ वाजेपर्यंत आयोजित केली आहे. कार्यशाळेत काऊन्सेलर डाॅ.रुपाली सरोदे, माईंड कोच डॉ.नितीन विसपुते हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
मोबाईलचा अतिवापर करणारे सर्व जण कार्यशाळेत सहभागी होऊन मोबाईलचा अतिरेक सहज थांबवू शकतात. मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान जसे वेळेचा दुरुपयोग, शैक्षणिक नुकसान, मानसिक आजार, डिप्रेशन, चिडचिड, मुलांची विद्रोही मनोवृत्ती, कामाकडे दुर्लक्ष, वाढते घटस्फोट आणि अजून कितीतरी गोष्टी असे सर्व थांबविण्यासाठी कार्यशाळेत उपचार, चर्चासत्र, ब्रेन प्रोगामिंग आणि टिप्स दिल्या जाणार आहेत. कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्या १२ ते ६० वयोगटातील सर्वांनी नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी ९५६१६०२३३३, ९४२२७७६२३३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदविण्याचे आवाहन चेतन व्यसनमुक्ती केंद्राने केले आहे.