‘School’ Popular In Society : संयमी अन्‌ अभ्यासू शिक्षकांमुळेच ‘शाळाच’ समाजप्रिय ठरते

0
16

बहादरपुरातील कार्यक्रमात कवी मनोहर आंधळे यांचे ठाम मत

साईमत/पारोळा/प्रतिनिधी : 

“मज मनापासूनी आवडते ही शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा” अशा काव्योक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळा हवी असते. सोप्याकडून कठीणाकडे नेत अभ्यासाची व विषय काठीण्य पातळीची जराही भीती न दाखवता आईप्रमाणे शिक्षकाची भूमिका असली पाहिजे. म्हणजे तो विषय व शिक्षक विद्यार्थ्यांना आवडू लागतो. अर्थातच अश्याच मायाळू, संयमी व अभ्यासू शिक्षकांमुळेच शाळा समाजप्रिय ठरते, असे चाळीसगाव येथील कवी मनोहर आंधळे यांनी आपले ठाम मत मांडले.ते पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे नुकत्याच झालेल्या नूतन शिक्षण मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्ष व संस्थापक-अध्यक्ष कै. रामलाल काळूराम मिश्र यांच्या जयंतीनिमित्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंचावरून बोलत होते. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष उमेशचंद्र वैद्य, जळगाव ग. स. सोसायटीचे माजी चेअरमन मनोज पाटील, संस्थापकांचे सुपुत्र, ट्रस्टी नारायण मिश्र, संस्थेचे संचालक सदस्य उपस्थित होते.

शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती उत्सवानिमित्त पसायदान म्हणण्यात आले. त्याचे सूत्र शिक्षक एच. वाय. पाटील यांनी सांभाळले. यानंतर दरवर्षाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. संस्थेमार्फत सालाबादप्रमाणे दिला जाणारा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक समाधान देविदास निकम यांना प्रदान करण्यात आला. आदर्श विद्यार्थी म्हणून रिजवान मुजावर शेख तर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार रेणुका हेमंत जावरे हिला देण्यात आला. त्याचप्रमाणे दहावीतील प्रथम क्रमांक मानकरी निकिता संजय साळुंखे, इयत्ता बारावीतील प्रथम क्रमांक प्राप्त कुंदन गंगाधर जाधव या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत सुवर्णपदकाचे आणि रोख रकमेचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात कुणाल भगवान अमृतकर, आदेश रवींद्र चौधरी, निलेश संजय बागुल, चिन्मय प्रशांत मुळे, रितिका हिरालाल साळुंखे आदींचा समावेश होता.

यावेळी मनोज पाटील, विद्यार्थ्यांमध्ये निकिता पाटील, निलेश पाटील, संस्थेच्या सभासदांमधून प्रातिनिधीक स्वरूपात संस्थेचे माजी व्यवस्थापक डॉ.ए.आर.पाटील, संस्थेमार्फत संस्थेचे व्यवस्थापक गोपाल पाटील, सचिव प्रा. डॉ.संजय भावसार, उमेशचंद्र वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नूतन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर महाजन, सचिव प्रा. डॉ.संजय भावसार, कोषाध्यक्ष निंबा चौधरी, व्यवस्थापक गोपाल पाटील, संचालक वसंत बडगुजर, सुधाकर पाटील, संतोष चौधरी, नानाभाऊ गुरव, श्रीकांत वाणी, स्वाती बडगुजर, सल्लागार भगवान अमृतकर, रा. का. मिश्र विद्यामंदिराचे प्राचार्य जी. डी. जाधव, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.व्ही.एन.कोळी, बद्रीनाथ इंग्लीश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका छाया पाटील, पर्यवेक्षक व्ही. के.परदेशी, विद्यार्थी स्वराज्य सभा प्रमुख प्रा.बी.व्ही.सोनार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेचे प्राचार्य जी. डी. जाधव यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.बी.व्ही.सोनार, प्रा.योगेश पाटील तर आभार प्रा.जी.एस.पाटील यांनी मानले. बक्षीसपात्र विद्यार्थी उद्घोषणेचे काम प्रा.निलेश जोशी यांनी सांभाळले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here