एकता महर्षी मेहतर बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा भागातील संत मिराबाई परिसरातील एकता महर्षी मेहतर बहुउद्देशीय संस्थेतर्फे समाजातील दहावी, बारावी तसेच पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी दै. ‘साईमत’चे कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, सामाजिक कार्यकर्ते दिलीप चांगरे, समाजसेवक रमेश घुसर, डॉ.उमेश गोगडिया, प्रा. अविनाश जावळे, प्रा.सुनील खोडे, सफाई कामगार युनियनचे अध्यक्ष अजय घेंगट, जितेंद्र बागरे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
ज्या समाजात आपला जन्म झाला. त्या समाजाचे ऋण फेडावे लागते.विद्यार्थ्यांनी शिक्षणात अथक परिश्रम घेऊन उच्च शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे आ.सुरेश भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सांगितले. यशस्वीतेसाठी सुंदरलाल खरारे, राजेश घुसर, यश घुसर, मुकेश थांबे, विजय तबोली, शंकर हंसकर, विवेक चव्हाण, मोहित जावे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भगतसिंग चावरीया तर आभार संस्थेचे अध्यक्ष राजेश घुसर यांनी मानले.