उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रशंसा करून उपस्थितांना केले आश्चर्यचकित
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
जिल्हा प्रशासनातर्फे जळगाव जिल्ह्यात झालेल्या कामांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुक्तकंठेपणाने प्रशंसा केली. रविवारी, १७ ऑगस्ट रोजी श्री.पवार जळगाव दौऱ्यावर आले होते. जिल्हा नियोजन भवनात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांची आढावा बैठक त्यांनी घेतली. बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री संजय सावकारे, खा. स्मिताताई वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.अमोल पाटील. आ.किशोर पाटील, आ. अनिल भाईदास पाटील,आ. चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री.पवार म्हणाले, मी राज्यभर फिरत असतो, कामकाजाची माहिती घेत असतो. मी प्रामाणिकपणे सांगतो की, जिल्ह्यातील काम बघून मला समाधान वाटले. विशेषतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाची पद्धत खूप प्रशंसनीय आहे. आपल्या कर्तव्याला समर्पित असे हे अधिकारी आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना पुणे जिल्ह्यातही चांगले काम केले आहेत. मंत्रालयात त्यांना काही काम असल्यास त्यांनी माझ्याकडे यावे, त्यांना सहकार्य करणे मला आवडेल, असेही त्यांनी बैठकी सांगितले. तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. श्री.पवार सहसा अधिकाऱ्यांची प्रशंसा करीत नाहीत,पण त्यांनी श्री.प्रसाद यांची प्रशंसा करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले होते.