राष्ट्रगीत अन् ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कंजरभाट समाज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या गजरात आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. प्रारंभी कै. दिलीप गागडे, समाजाचे माजी अध्यक्ष सचिन बाटुंगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. बाविस्कर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदा पाटील, संजयसिंग पाटील, मंजुषा बियाणी, प्रल्हाद महाजन यांसह समाजातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सुमित माछरे यांनी देशभक्तीपर गाणे सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. त्यानंतर प्रतिभा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीत कवायतीला भरभरून दाद मिळाली. देशभक्तीपर गीतांसह कवितांनी वातावरण भारावून गेले होते.
याप्रसंगी कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, सहसचिव संतोष रायचंदे, खजिनदार योगेश बागडे, कार्यकारिणी सदस्य विजय अभंगे, नरेश बागडे, संदीप गारुंगे, उमेश माछरेकर, क्रांती बाटूंगे, वीर दहियेकर, पंकज गागडे, राहुल दहियेकर तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिरजू नेतलेकर, मोहन चव्हाण,महेश माछरे, अजय बागडे, प्रकाश दहियेकर, नितीन बाटूंगे, गणेश बागडे, सुमित माछरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपमाला बाटूंगे,यशोदा गागडे, अनिता अभंगे, श्वेता चव्हाण यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष राहुल नेतलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. यशस्वीतेसाठी राज नेतले, राकेश भाट, अर्जुन माछरे, पवन दहियेकर, पंकज नेतलेकर, सुदाम बागडे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन नरेश बागडे तर आभार उमेश माछरेकर यांनी मानले.