संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेसह ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेसह ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी पसायदानाचे सामूहिक गायन केले. प्रा.रूपम निळे यांनी पसायदान गायन केले तर प्रा.संध्या महाजन यांनी पसायदानाचा अर्थ स्पष्ट करून देताना संत परंपरेतील संत ज्ञानेश्वरांचे स्थान किती मोठे आहे हे सांगताना त्यांचे चरित्र श्रोत्यांना उलगडून सांगितले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे होते.
अध्यक्षीय भाषणात संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करताना ज्ञानेश्वरीचा महिमा किती थोर आहे, याबाबत श्री.ठाकरे यांनी विवेचन केले. याप्रसंगी वाड्मय मंडळाचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक प्रा.स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा.उमेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संदीप वानखेडे, वाड्मय मंडळ प्रमुख प्रा.गणेश सूर्यवंशी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा.अर्जुन मेटे, प्रा.ईशा वडोदकर, डॉ.रणजीत पाटील, डॉ.अतुल इंगळे, डॉ. जयंत इंगळे, प्रा.प्रवीण महाजन, प्रा.विनोद वैदकर, प्रा.एकता कवटे, प्रा.उमेश ठाकरे, प्रा.संदीप गव्हाळे, विजय जावळे, अजय काळे, चेतन वाणी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा.गणेश सूर्यवंशी, सूत्रसंचालन तथा आभार दीपक चौधरी यांनी मानले.