उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही होता समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
राज्यातील प्रत्येक शाळेत १४ ऑगस्ट रोजी ‘पसायदान’ म्हणण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालय, शिक्षण आयुक्त यांना काढले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार यंदाचे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे. शासनाच्या आदेशानुसार शहरातील मेहरुण भागातील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसह शिक्षकांसमवेत पसायदान म्हणण्यात आले.
उपक्रमासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील तसेच ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.