‘Mock Drill’ At Jalgaon Railway Station : जळगाव रेल्वे स्थानकावर ‘मॉक ड्रिल’ अन्‌ प्रवाशांची उडाली धांदल

0
21
(c)Kaushik K Shil +919903371497

प्रवाशांच्या सुरक्षेच्या खात्रीसाठी महत्त्वाचे ठरले ‘मॉक ड्रिल’

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

येथील रेल्वे स्थानकावर दोन दहशतवादी बॉम्बसह असल्याची माहिती मिळताच आरपीएफ, जीआरपीसह पोलीस रेल्वे स्थानकात दाखल झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर छावणीचे स्वरूप आले होते. पण हे पाहून प्रवाशांचीही धांदल उडाली होती. मात्र, हे सर्व मॉकड्रील असल्याचे माहिती झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव, १५ ऑगस्ट आणि पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी, १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब हल्ल्याचे मॉक ड्रिल घेण्यात आले.

प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या मॉक ड्रिलमध्ये बॉम्बसह दोन दहशतवाद्यांना पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. सरावासाठी जिल्हा पोलीस दल, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि भुसावळ जीआरपी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती भुसावळ जीआरपीचे पोलीस निरीक्षक सुधीर धायेरकर यांनी दिली.

यावेळी रेल्वे पोलिसांनी खबरदारी म्हणून शहर पोलीस पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, रेल्वे पोलीस पथक, शीघ्र कृती दल आणि श्वान पथकाला पाचारण केले होते. संभाव्य दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी ‘मॉक ड्रिल’ महत्त्वाचे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here