महालक्ष्मी देवी चॅरिटेबल ट्रस्टची वार्षिक सभा उत्साहात
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील महालक्ष्मी देवी चॅरिटेबल ट्रस्टची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद किसन मानकर होते. सभेला कडूबा पाटील, शकुंतला पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, प्रतिभा पाटील, व्ही.डी.पाटील आदी सभासद उपस्थित होते.
प्रास्ताविकात ट्रस्टचे सचिव डी.डी.पाटील यांनी ट्रस्टच्या कामकाजाविषयी सभासदांना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेमार्फत खुली जागा मिळवून महालक्ष्मी देवीचे भव्य मंदिर उभारण्याचा ट्रस्टचा संकल्प आहे. तो पूर्णत्वाकडे न्यायचा आहे. शहरात इतर अनेक मंदिरे आहेत. परंतु महालक्ष्मी देवीचे मंदिर नाही. शहरासह परिसरातील जनतेच्या मागणीनुसार महालक्ष्मी देवीचे मंदिर उभारले जाईल, असेही ते म्हणाले.
विश्वस्त मंडळाचे शिफारस अंदाजपत्रक मंजूर
सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यांनी २०२४-२५ वर्षापर्यंतच्या हिशोब पत्रके वाचून दाखविले. ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे २०२५-२६ या वर्षाकरिता विश्वस्त मंडळाचे शिफारस केलेले अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. शेवटी ट्रस्टचे अध्यक्ष वैशाली पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.