‘Pregnant Women’s’ : ‘गरोदर मातांची’ तपासणी मोहिमेला जामनेर तालुक्यात मिळाला प्रतिसाद

0
37

विशेष शिबिरातंर्गंत १ हजार ८ गर्भवती महिलांची केली तपासणी

साईमत/जामनेर/प्रतिनिधी : 

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कार्यक्रमांतर्गत जामनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि उपकेंद्र स्तरावर विशेष शिबिरातंर्गंत १ हजार ८ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पहिल्या तिमाहीतील ६७४ तर दुसऱ्या तिमाहीतील ३३४ गरोदर माता होत्या. गरोदर मातांची मोफत रक्तदाब, रक्तातील साखर, एचआयव्ही, ओजीटीटी आदींसह २२ प्रकारच्या तपासणी चाचण्या करण्यात आल्या. तसेच मोफत १६७ लाभार्थ्यांना सोनोग्राफीसाठी संदर्भित करण्यात आले.तीव्र रक्तक्षय असलेल्या ३ मातांना आयर्न सुक्रोज लावून उपचार करण्यात आला.

यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.दानिश खान, डॉ संदीप कुमावत, डॉ. मोहित जोहरे, डॉ.कोमल देसले, डॉ.किरण पाटील, डॉ.शारिक कादरी, डॉ.संदीप जाधव, डॉ.सागर पाटील, डॉ. रोहिणी गरुड यासोबतच सर्व समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.

गरोदर मातांची वेळेत तपासणी करून प्रसुतीच्या वेळी होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरवात केली आहे.गरोदर मातांनी शासकीय संस्थेत कमीत कमी सहा तपासण्या करून घेणे आवश्यक आहे.

-डॉ.राजेश सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, जामनेर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here