उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील साने गुरुजी कॉलनी स्थित कै.सुनिताताई जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ’ अश्या राख्या वर्गात कार्यानुभवाच्या तासिकेला बनविण्यात आल्या. ही कल्पना राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख संजय बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना दिली. झाडांना राख्या बांधून झाडांचे संवर्धन, संरक्षण करण्याविषयी मार्गदर्शन केले. उपक्रमात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, पर्यवेक्षक कैलास पाटील, राष्ट्रीय हरित सेनाप्रमुख संजय बाविस्कर, इको क्लबचे एस.के.तायडे, अनिल शेलकर, विजय पाटील, किशोर पाटील, रवींद्र पाटील, वैशाली बाविस्कर आदी शिक्षक उपस्थित होते.
वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात. पर्यावरणाचे संतुलन राखतात.झाडांपासून फळे, फुले, औषधी आपल्याला मिळते. म्हणून झाडांचे आपण संरक्षणासह संवर्धन केले पाहिजे, असे मुख्याध्यापक एस.पी.निकम यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व पटवून देतांना सांगितले. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक एस.डी.भिरुड यांचे मार्गदर्शन लाभले.
ह्या विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या
राख्या बनविणाऱ्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांमध्ये जान्हवी पाटील, आराध्या महाले, जिज्ञासा पाटील, लक्ष्मी गवळी, जान्हवी वडनेरे, मानसी पाटील, राजनंदिनी तिवारी, श्रद्धा पाथरवट, वैष्णवी जाधव, सिमरन तडवी, मानसी पाटील, चेतन जाधव, नकुल हजारे, सिद्धेश धोबी, विनायक ठोसरे, अक्षय जाधव, कुंदन सपकाळे, हितेश चौधरी, पीयूष चव्हाण, देवेंद्र महाजन, गिरीश चौधरी, चैतन्य जोशी, चेतन पगारे, स्वामी पाथरवट, खुश ठाकूर यांचा समावेश होता. त्यांनी राख्या बनवून वृक्षांना बांधल्या.
