कार्यालयातील बैठकीत मोर्चाच्या नियोजनावर चर्चा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
राज्य शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या राजीनामेसाठी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिला भगिनी आणि निराधार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी, इतर विविध मागण्यांसाठी शिवसेना उबाठाच्यावतीने सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. शहरातील गोलाणी मार्केटमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात मोर्चाच्या नियोजनासाठी गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी जिल्हा पदाधिकारी बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीत तालुका प्रमुख, तालुका संघटक, युवा सेना तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, विविध अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. बैठकीला शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, दीपक राजपूत, महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.
शासनाकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्याबद्दल मोर्चा
शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारमधील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात आणि अनेक लोकोपयोगी योजना बंद केल्याच्या निषेधार्थ तसेच निवडणुकीत शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल शिवसेना उबाठाच्यावतीने मोर्चाचे आयोजन केले आहे. बैठकीत मोर्चाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर जास्तीत जास्त संख्येने मोर्चात उपस्थित कसे होतील, यावरही चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.
