परिसरातून निघाली पालखी, गुणवंतांचा गुणगौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील ओक मंगल कार्यालयात जिव्हेश्वर युवक मंडळातर्फे साळी समाजाचे आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला सकाळी सहा वाजता भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव झाला. यावेळी रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले. तसेच सत्यनारायण महापूजा समाजातील नवदाम्पत्य सागर-लीना दिवटे यांच्या हस्ते झाली. त्यानंतर परिसरातून पालखी काढण्यात आली. त्यात वाजत गाजत लेझीम, फुगडी खेळत समाज बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमात समाजातील महिला, मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी आ.राजु मामा भोळे, उद्योगपती यशवंत बारी, वीज महावितरणचे जळगाव शहर व तालुका कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, संस्थापक-अध्यक्ष अरुण डहाके, जिल्हाध्यक्ष अशोक दिवटे, युवक मंडळाचे अध्यक्ष राजु खेडकर आदी उपस्थित होते.
गुणगौरव कार्यक्रमात ईशांत डहाके, ईशांत साळी, जयमाला लोखंडे, खुशील आकडकर, अथर्व साळी, सिद्धेश डहाके, निखिल साळी, हंसिका डहाके, आयुष निकुंभ, वैष्णवी साळी, ऐश्वर्या वैद्य, साक्षी साळी यांना गौरविण्यात आले. महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी दीपाली खंडारे, नेहा खंडारे यांनी महिला मंडळातर्फे महिलांसाठी खेळ घेऊन उत्साह वाढविला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात मोक्षदा खंडारे, श्रेया साळी, जिवीका साळी, देवांशी वाझट, भूविका डहाके, हर्षींनी धमके, नेत्रा साळी यांनी सहभाग घेतला.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी सचिव किशोर खंडारे, कोषाध्यक्ष नाना भोगरे, सहसचिव पद्माकर आखडकर, दिनेश साळी, दत्ता भोगरे, महिला मंडळाच्या सुलभा साळी, ज्योती साळी, संगीता भोगरे, जयश्री डहाके, दीपाली खंडारे, नेहा खंडारे, दीपा डहाके, कोमल भोगरे, गायत्री भोगरे, काजल भोगरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुधीर खंडारे यांनी केले.
