निवडीत उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे, सचिव ॲड. विरेंद्र पाटील, सहसचिव ॲड. लीना म्हस्के तर कोषाध्यक्षपदी ॲड. प्रवीण चित्ते यांचाही समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस निर्माण झाली होती. यंदाच्या निवडणुकीत ॲड. सागर एस. चित्रे यांनी अध्यक्षपदावर विजय मिळविला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. संजय राणे यांचा १०१ मतांनी पराभव केला. अध्यक्षपदासोबतच इतर पदांवरही नूतन पदाधिकारी विराजमान झाले आहेत. त्यात उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता आर. झाल्टे, सचिवपदी ॲड. विरेंद्र एम. पाटील, सहसचिवपदी ॲड. लीना ए. म्हस्के आणि कोषाध्यक्षपदी ॲड. प्रवीण ए. चित्ते यांचा निवडीत समावेश आहे. तसेच १० सदस्यांमध्ये ॲड. कोमल एस. काळे, ॲड. दीपक ए. शिरसाठ, ॲड. जितेंद्र ए. कोळी, ॲड. चेतन बी. गुजर, ॲड. सचिन एस. हटकर, ॲड. हर्षल सी. संत, ॲड. श्रीरंग जी. पाटील, ॲड. प्रवीण डी. रंधे, ॲड. शारदा टी. सोनवणे, ॲड. कल्पना ए. शिंदे यांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडले. मतदानासाठी १ हजार १० मतदारांपैकी ८८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच ८७.२२ टक्के मतदान झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. मतदानापूर्वी महिला सदस्य पदासाठी ॲड. शारदा सोनवणे, ॲड. कल्पना शिंदे यांची बिनविरोध निवड झाली होती.
फटाके फोडून समर्थकांचा जल्लोष
जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. सागर चित्रे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. संजय राणे, ॲड. गोपाळ जळमकर यांचा पराभव करुन अध्यक्षपदावर निवडून आले आहेत. सायंकाळी ४.३० वाजता मतमोजणीला सुरवात होऊन रात्री १०.३० वाजेपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष अशा प्रमुख पदांचे निकाल जाहीर करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी ॲड. सागर चित्रे यांचे नाव जाहीर होताच न्यायालयाच्या परिसरात त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष साजरा केला. ढोल-ताश्यांसह फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी ॲड. सागर चित्रे यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय संपूर्ण बार कौन्सिलला (वकील संघाला) दिले आहे. त्यांच्या विजयामुळे जळगाव जिल्हा वकील संघात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
