Shiv Sena Ubat : शिवसेना उबाठातर्फे २ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
26

जळगावातील तरुण कुढापा चौकात स्तुत्य राबविला उपक्रम

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील शिवसेना उबाठा महानगर शाखेतर्फे २ हजार गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशा धोरणानुसार शिवसेना नेहमीच समाजासाठी विविध उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून जळगावमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला माजी नगरसेवक तथा पक्षाचे अभ्यासू नेते अनंत जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाला संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, नितीन लढा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम सोनवणे, महिला आघाडी महानगर प्रमुख गायत्री सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी संतोष चौधरी, प्रल्हाद पाटील, गौरव सोनार, मोहित पाटील, प्रकाश चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अण्णासाहेब सागरमल सांखला पतसंस्थेचे चेअरमन सुभाष सांखला यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रशांत सुरळकर, सूत्रसंचालन संजय दुसाने तर आभार उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here