Khubchand Sagarmal School : खुबचंद सागरमल विद्यालयात गणवेश वाटपामुळे विद्यार्थांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य

0
46

रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्तुत्य उपक्रम

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना नुकतेच गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याने विद्यार्थांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. अध्यक्षस्थानी शाळेचे समन्वयक कैलास सोनार होते.

याप्रसंगी डॉ.धनंजय बेंद्रे, डॉ.गणेश पाटील, नारीशक्तीच्या अध्यक्ष मनीषा पाटील, नीता वानखेडकर, कांचन पाटील, किमया पाटील, रेणुका हिंगु, आशा मोर्य, हर्षा गुजराती, नूतन तासखेडकर, वंदना वंडावरे, सहाय्यक फौजदार अलका वानखेडे, पोलीस हवालदार राजीव जाधव, रेल्वे सल्लागार समिती सदस्य विराज कावडीया, शाळेच्या मुख्याध्यापिका योगिनी बेंडाळे, पर्यवेक्षक सुरेश आदीवाल, मुख्याध्यापक निखिल जोगी आदी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी कल्पना देवरे, करुणा महाले, सुनीता येवले, मंगला सपकाळे, योगेंद्र पवार, अजय पाटील, पंकज सूर्यवंशी, सुनील साळवे, राहुल देशमुख, संतोष चौधरी, राजेश इंगळे, संजय पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत महाजन तर आभार प्रवीण पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here