विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुण भागातील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील तृष्णी राठोड, दिवेश जंगले ह्या विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्या महान कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी तृष्णी राठोड, भार्गवी पाटील, शितल हटकर, हर्षदा पाटील, चेतन सोनार, रितेश लोहार, राशी धनपाल ह्या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्यासह शिक्षक ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन तिसरीची विद्यार्थिनी करुणा सपकाळे तर चवथीचा विद्यार्थी चेतन सोनार याने आभार मानले.