संमेलनासाठी महिला मान्यवरांची उपस्थिती लाभणार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील महाबळामधील अभियंता भवनात ‘आम्ही सिध्द लेखिका’ संस्थेच्या शाखेतर्फे रविवारी, ३ ऑगस्ट रोजी
सकाळी १० वाजेपासून केवळ महिलांसाठी ‘काव्यधारा काव्य संमेलना’चे आयोजन केले आहे. काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री माया धुप्पड राहतील. उद्घाटक ‘आम्ही सिध्द लेखिका’ संस्थेच्या खान्देश विभाग प्रमुख प्रा.संध्या महाजन असतील. तसेच स्वागताध्यक्ष कवयित्री जयश्री काळवीट राहतील. संमेलनास लेखिका प्रा.विमल वाणी, ललिता टोके, स्मिता चौधरी यांचीही उपस्थिती राहील.
महिलांनी संमेलनाचा आनंद घेण्याचे आवाहन
संमेलनात जळगाव परिसरातील कवयित्री सहभागी होतील. संमेलनासाठी संस्थेच्या उपाध्यक्ष ज्योती राणे, सदस्य ज्योती वाघ, संध्या भोळे, संगिता महाजन, पुष्पा साळवे, इंदिरा जाधव, मंजुषा पाठक, सुनिता येवले आदी सर्व भगिनी परिश्रम घेत आहेत. संमेलनाचा काव्य रसिक महिलांनी आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.