परिसरात पसरले धार्मिक वातावरण, मध्यरात्रीनंतर विसर्जन मिरवणूक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील आसोदा येथील चौधरी वाड्यालगतच्या गणपती मंदिराजवळ शशिकांत भोजू येवले यांच्या निवासस्थानी गेल्या ७ वर्षांपासून सलग दशामाता देवीची स्थापना करण्यात येत आहे. यंदाही त्यांनी गेल्या गुरुवारी, २४ जुलै रोजी दशामाता देवीची स्थापना केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी कल्पना येवले आणि परिवार परिसरातील भाविक, भक्त भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात. त्यामुळे परिसरात धार्मिक वातावरण पसरले आहे. येत्या शनिवारी, २ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दशामाता देवीच्या स्थापनेनिमित्त बहुतांश ठिकाणी भाविक दहा दिवस उपवास करतात. आठव्या दिवशी कुमारिका बसविल्या जातात. दहाव्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम तर अकराव्या दिवशी दशामातेला नैवेद्य दाखवून विसर्जन कार्यक्रमाची तयारी केली जाते. हे विसर्जन मध्यरात्रीनंतर केले जाते, असेही शशीकांत येवले यांनी सांगितले.
