C. S. Society : ग. स. सोसायटीच्या वार्षिक सभेत उडाला गोंधळ

0
47
(c)Kaushik K Shil +919903371497

विविध मागण्यांसह प्रश्न मांडण्याचा लोकमान्यचे मगन पाटीलांनी केला प्रयत्न

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सोसायटीच्या (ग. स. सोसायटी) शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात रविवारी, २७ जुलै रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाल्याचे दिसून आले. ग.स.सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील हे वार्षिक अहवाल सादर करत होते. तेव्हा लोकमान्य गटाचे अध्यक्ष मगन पाटील यांनी त्यांना विरोध दर्शविला. तसेच माहिती मांडण्यात अडथळा निर्माण केला.

सभेत मगन पाटील यांनी व्यासपीठावर जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा विरोधी सहकार गट, प्रगती गट आणि लोक सहकार गटाच्या सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्याजवळील माईक हिसकावून घेतल्याचा आरोप मगन पाटील यांनी केला. ग.स. सोसायटीच्या कर्जावरील व्याज कमी करावे, नोकर भरती करू नये यासह विविध मागण्यांसह प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सभेत सभासदांनी त्यांना बोलू दिले नसल्याचा आरोप करत त्यांनी सहकार गट, प्रगती गट आणि लोक सहकार गटाचा निषेध व्यक्त केला.

अनुभवी अध्यक्षांनी सभेत गोंधळ घालणे चुकीचे

मगन पाटील हे यापूर्वी ग. स. सोसायटीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सुरू असलेल्या बैठकीत त्यांनी प्रास्ताविक करत असताना व्यत्यय आणणे चुकीचे आहे. अनुभवी अध्यक्षांकडून सभेत गोंधळ घालण्याची अपेक्षा नव्हती. दरम्यान, त्यांचे म्हणणे आणि निवेदन स्वीकारले आहे. त्यांचे प्रास्ताविक झाल्यावर त्यांना बोलण्याची संधी दिली होती. परंतु त्यांनी आपले मत मांडले नाही, अशी प्रतिक्रिया ग. स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here