एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांची मागणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
हल्लीच्या धावत्या युगात अनेक लोक असे आहेत की, कोणाच्या आधाराविना विविध कारणांमुळे सिंगल म्हणजे ‘एकल’ जीवन जगत आहेत. त्यात अनेक स्त्री-पुरुष, युवक-युवतींचा समावेश आहे. त्यांच्या भविष्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनात त्यांचा शिक्षणाचा प्रश्न, आरोग्य, स्वतःचे हक्काचे घर, रोजगार, सुरक्षितता, आपुलकीचा वर्ग, दरमहा शासनाकडून वेतन मिळावे, अशा अनेक विषयांवर जीवन जगणाऱ्या लोकांसाठी विविध कार्पोरेट कंपनी, विविध समाजसेवी संस्था, सोशल वर्कर्स, देणगीदार, अभ्यासक आदी लोकांनी अशा लोकांना समजून घेऊन सहकार्य करणे काळाची गरज आहे. अशा एकल, अविवाहित (एज बार झालेले) व्यक्तींना शासनाने त्यांच्या उदरनिर्वाहासह विकासासाठी विविध योजना राबवाव्यात. तसेच कोणताही निकष न लावता प्रतिमाह मानधन सुरू करावे, अशी मागणी एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांनी केली आहे.
अशा व्यक्तींसाठी ठिकठिकाणी विविध सेवा प्रकल्पांची गरज आहे. तसेच त्यांना सहकार्य करणारे आपुलकी सेवा केंद्र असावे. अशा अनेक प्रकारचे सिंगल अर्थात ‘एकल’ जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी कार्यरत करणे ही काळाची गरज झाली आहे. अशा व्यक्तींनी दाद मागावी तर कुणाकडे…? असा यक्ष प्रश्न सद्यस्थितीला उभा ठाकला आहे. अशा सर्व व्यक्तींचे एकत्रिकरण आणि विविध जीवनावश्यक सोयी सुविधा असलेले सेवा प्रकल्प, समाजातील विविध सामाजिक संस्था, विविध कार्पोरेट समूह, देणगीदार, लेखक आदी व्यक्तींनी याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करून याबाबत मार्गदर्शन सहकार्य करावे. तसेच अशा व्यक्तींचे जीवनमान उभे करण्यास आपापल्या परीने हातभार लावणे अतिशय गरजेचे आहे. याबाबत स्वारस्य असणाऱ्या व्यक्ती, संस्था, अभ्यासक विषय अधिकाधिक ठिकाणी प्रसारीत करावा, याबाबत सूचना अथवा समस्या असल्यास एकल-अविवाहित विकास मंचचे प्रमोद पाटील (मो.नं. ९३२६३५९२२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.