खान्देशस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथे अठरावे बहिणाबाई-सोपानदेव चौधरी खान्देश स्तरीय साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. संमेलनात डॉ. अशोक पारधे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना संमेलनात आ.राजूमामा भोळे, खा.स्मिताताई वाघ, विष्णू भंगाळे, स्वागताध्यक्ष पुष्पा साळवे, साहित्यिक बी.एन.चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे, डॉ.अरविंद नारखेडे, सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड, आयोजक डॉ.विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, विजय लुल्ले, प्रा.संध्या महाजन, सुनिता येवले, मनोहर तेजवानी, प्रकाश पाटील, डॉ. अ. फ. भालेराव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला.
जळगावातील साने गुरुजी कॉलनी स्थित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथी इंग्लिश स्कूल येथे गेल्या ३५ वर्षांपासून अशोक पारधे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते उत्कृष्ठ सूत्रसंचालन, निवेदन करतात. यापूर्वी त्यांच्या ‘ कष्टशिवाय फळ नाही’ कवितेचे पोस्टर प्रकाशन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या हस्ते झाले आहे. अशोक पारधे यांच्या सन्मानाबद्दल त्यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रासह सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.