New Entrepreneurs In The District : जिल्ह्यातील नवउद्योजकांना संवादामुळे मिळणार चालना

0
23

समग्र विकासासाठी बैठक ठरली फलदायी, नवकल्पनांवर झाली चर्चा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

जिल्ह्यातील स्टार्टअप्स, नवउद्योजक, इनोव्हेटर्स आणि इन्क्युबेशन संस्थांसोबत ‘इंजिन्स ऑफ ग्रोथ संवाद’ अशा विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक जिल्ह्याच्या समग्र विकासासाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या आधारे स्थानिक उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून फलदायी ठरली आहे. संवादात कृषी, अन्न प्रक्रिया, अ‍ॅगटेक, हेल्थटेक, फिनटेक, एडटेक अशा विविध क्षेत्रातील नवकल्पनांवर सविस्तर चर्चा झाली.

स्टार्टअप्सना आवश्यक निधी, मार्गदर्शन, सवलती आणि सशक्त इकोसिस्टीम मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, बँका, विद्यापीठे आणि औद्योगिक संस्था यांच्यात त्रिसूत्री समन्वयाची संकल्पना मांडण्यात आली. स्थानिक तरुणांसाठी उद्योजकतेचे प्रशिक्षण, व्यावसायिक सल्ला आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवर विशेष भर देण्यात आला. संवादावेळी जिल्ह्याच्या आर्थिक विकासात स्टार्टअप्स ‘इंजिन्स ऑफ ग्रोथ’ ठरतील, असा विश्वासही व्यक्त केला.

स्टार्टअप संस्कृती बळकट करण्याच्या दिशेने उचलले पाऊल

बैठकीत उपस्थित असलेल्या विविध स्टार्टअप प्रतिनिधींनी आपले अनुभव, अडचणी आणि अपेक्षा मांडत पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी विचार मांडले. स्थानिक संधी ओळखून डिजिटल, नवोन्मेषी दृष्टिकोनातून जिल्ह्याचा विकास शक्य आहे, यावर सर्वांचा ठाम विश्वास होता. अशा संवादामुळे जिल्ह्यातील नवउद्योजकांना चालना मिळणार आहे. स्टार्टअप संस्कृती बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here