स्थापनेपूर्वी २० ला आयोजकांतर्फे निघणार शोभायात्रा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरजवळील सुख अमृत नगर येथे अर्ध नारेश्वर महादेव शिवलिंगाची, नंदी देवताची सोमवारी, २१ रोजी सकाळी ८ वाजता स्थापना करण्यात येणार आहे. स्थापनेपूर्वी रविवारी, २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
अर्ध नारेश्वर महादेव शिवलिंगासह नंदी देवताची २० रोजी दुपारी १२ वाजता जोगेश्वरी माता मंदिरापासून ते गणपती नगर त्यानंतर सुख अमृत नगरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सुख अमृत नगर येथील खुल्या जागेतील मंदिरात सोमवारी, २१ रोजी सकाळी ८ वाजता चेतन कपोले महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा करून जोडप्यांच्या हस्ते होम हवन, अर्ध नारेश्वर महादेव, नंदी देवताची स्थापना करण्यात येईल. कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन अर्ध नारेश्वर महादेव महिला मंडळाने केले आहे.