जळगाव शहरातील शिंपी समाजाच्या विविध संघटनांनी व्यक्त केला तीव्र निषेध
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
पुणे येथे शिक्षणासाठी गेलेला शिंपी समाजाचा युवक निखिल अशोक सावळे (रा.ठेंगोडा, ता.बागलाण) ह्याच्या झालेल्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांना कडक शासन होण्याबाबत जळगाव शहरातील शिंपी समाजाच्या विविध संघटनामार्फत तीव्र निषेध व्यक्त करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी, एकता शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, महाबळ परिसर नाम संस्कृती शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष किशोर निकुंभ, नाम विश्व शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जगताप, जळगाव सांस्कृतिक आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय चव्हाण, जळगाव नाम संस्कृती फाउंडेशनचे मनोज नेरपगार, समाजसेविका सविता बोरसे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब कापडणे उपस्थित होते.
