उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक, माध्यमिक, डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवारी, १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छांसह भेटवस्तू देऊन स्वागत केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच महर्षी व्यास यांच्या महान कार्याची विद्यार्थ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शाळेतील भार्गवी पाटील, चेतन सोनार, राशी धनपाल, मैथली देवरे या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक ज्ञानचंद बऱ्हाटे, केतन बऱ्हाटे, संदीप खंडारे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन चवथीच्या वर्गाचा विद्यार्थी चेतन सोनार तर आभार प्रदर्शन भार्गवी पाटील हिने मानले.