जळगावात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) गुरुकुल कॉलनी, क्राऊन बेकरी मागे, सेट. जोसेफ स्कूलजवळ, एम. जे. कॉलेज रोड, जळगाव यांच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
गुरुवारी, १० जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर दिवसभर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत गुरुपूजनाचा कार्यक्रम सुरू राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी आरती, महानैवैद्य अर्पण करण्यात येईल. सकाळी ११ वाजता मार्गदर्शन व सामुदायिक श्री स्वामी चरित्र वाचन होईल तर सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सायंकाळची आरती होईल. याव्यतिरिक्त ११ माळ जपाचे आयोजनही केले आहे.
सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या घरासह परिसरातील मित्रमंडळींसह उपस्थित राहून अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद घ्यावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.