परिसरातून पालखीसह निघाली दिंडी, आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते महाआरती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
प्रती पंढरपूर असलेल्या पिंप्राळा येथील पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील विठ्ठल मंदिरात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सकाळी सौ. कुमुद-यश धन्यकुमार जैन, वर्षा-सचिन अशोक चौधरी अशा दोन्ही नवदाम्पत्यांच्या हस्ते महापूजेसह दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच चित्रादेवी प्रभाकर लाठी, नेहा जितेंद्र लाठी यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी कॉलनी परिसरातून पालखीसह दिंडी काढण्यात आली. रात्री आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील महिला पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, माजी नगरसेवक विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर पांडुरंग साई भजनी मंडळातर्फे भजनसंध्याचा कार्यक्रम झाला. पिंप्राळा पंचक्रोशतील भाविकांनी पिंप्राळा रथोत्सवासोबतच येथील पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे पांडुरंग साई बहुद्देशीय संस्थेतर्फे आयोजन केले होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी धन्यकुमार जैन, संजय कुलकर्णी, संतोष सांगोरकर, प्रदीप धनगर, अशोक पाटील, नवल पांडे, गणेश पाटील, भूषण पाटील, भूपेश बडगुजर, कैलास वाघ, धनराज धनगर, मनोज पाटील, साईनाथ धनगर, नितीन पाटील, अमोल पाटील, भूषण काळे, धनराज तायडे, प्रतीक पाटील, सिद्धार्थ अहिरे, राकेश माहेश्वरी, लक्ष्मीकांत लड्ढा, जिवनदास मेश्राम, दत्ता सोनवणे, मंगेश शिरसाठ, पंकज शिरसाठ, महेश पाटील, बबलु सुरवाडे, निखिल बाविस्कर, हेमंत ठाकुर, प्रशांत चौधरी, राजेंद्र दांडगे आदींनी परिश्रम घेतले.