Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»Ms. Smitatai Wagh : श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे खा. स्मिताताई वाघ यांचा सत्कार
    Uncategorized

    Ms. Smitatai Wagh : श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे खा. स्मिताताई वाघ यांचा सत्कार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 11, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संरक्षण भिंतीसाठी १० लाखांची आ.राजूमामा भोळेंनी केली घोषणा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    येथील श्रीकृष्ण कॉलनी परिसरात श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा. स्मिताताई वाघ यांना ‘संसदरत्न’ जाहीर झाल्याबद्दल नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक प्रा. सचिन पाटील उपस्थित होते.

    लोकसभा, राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राईम पॉईंट फाउंडेशन संस्थेकडून ‘संसदरत्न’ पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. तसेच लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा गौरव केला जातो. त्यात ‘संसदरत्न’ म्हणून जळगावच्या खा. स्मिताताई वाघ यांचा समावेश आहे. याबद्दल श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे त्यांचा ज्येष्ठ नागरिक अविनाश नेहेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी त्यांच्या आमदार निधीतून खुल्या जागेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच उर्वरित शौचालय, पेव्हर ब्लॉक बांधकामासाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थी दशेपासून कायम सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात स्मिताताईंनी काम केले. त्यामुळे जनतेने त्यांना खासदार केले आहे. एवढेच नव्हे तर लोकसभेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविल्यामुळे त्यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला, असल्याची प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली.

    यांनी घेतले परिश्रम

    यशस्वीतेसाठी हितेंद्र धांडे, उमेश पाटील, मिलिंद काळे, नितीन अत्तरदे, राजू शिंदे, उन्नती कुलकर्णी, ज्योत्स्ना धांडे, विमल धांडे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ए.व्ही.जाधव, सूत्रसंचालन जयेश कुलकर्णी तर आभार अविनाश नेहेते यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकाऱ्यांचा बारामतीत दुर्दैवी विमान अपघातात बळी

    January 28, 2026

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.