Raza Colony : रजा कॉलनीत अल्पवयीन मुलीने संपविले ‘जीवन’

0
21

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील रजा कॉलनीत घरी एकटीच असणाऱ्या १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी, १० जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, हुमेरा रहीम पटेल (वय १५, रा. रजा कॉलनी, जळगाव) असे मयत मुलीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, तिने आत्महत्या का केली, त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याचे सांगण्यात आले.

मजुरी काम करणारे तिचे वडील रहीम पटेल कामावर गेले होते. त्यांच्या पत्नी नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर मुलगा घराबाहेर खेळत होता. घरात एकटीच असलेल्या हुमेराने गळफास घेतला. भाऊ घरात गेला, त्यावेळी त्याला बहीण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यावर मुलीला डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह मित्र परिवाराने गर्दी केली होती. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here