Pimprala Hudko Dies During Treatment : विषारी औषध केले प्राशन : पिंप्राळा हुडकोतील प्रौढाचा उपचारावेळी मृत्यू

0
14

रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील एका ४५ वर्षीय प्रौढाने जवळील जंगलात विषारी औषध सेवन केल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारावेळी त्याचा रुग्णालयात मंगळवारी, २७ मे रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला. मात्र, त्याने विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जितू सोमा अहिरे (वय ४५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी जितू अहिरे यांनी २० मे रोजी पिंप्राळा हुडको परिसरातील जंगलात जाऊन विषारी औषध प्राशन केले होते. त्यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच, त्या परिसरातील बकऱ्या चारणाऱ्या मजुरांनी त्यांना पाहिले. त्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, अखेर मंगळवारी रात्री १० वाजता जितू अहिरे यांची प्राणज्योत मालवली. जितू अहिरे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here